NMMS Scholarship Exam 2022-23  online form filling राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा  (NMMS) २०२२-२३

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS२०२२-२३ सन २००७-०८ पासून इयत्ता ८ वीच्या अखेर आर्थिक दुर्बल घटकातील प्रज्ञावान विद्यार्थ्याचा शोध घेऊन बुध्दिमान विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने त्यांना आर्थिक सहाय्य करावेत्यानुसार विद्याथ्र्यांचे उच्च माध्यमिक स्तरापर्यंतचे शिक्षण घेण्यास मदत व्हावीआर्थिक दुर्बलतेमुळे प्रज्ञावान विद्यार्थ्याची उच्च माध्यमिक स्तरापर्यंत होणारी गळती रोखावी हे या योजनेचे उद्दिष्ट  ठेऊन दरवर्षी परिक्षा घेण्यात येते. यासाठी शाळा नोंदणी करून विद्यार्थी ऑनलाईन फॉर्म भरणे आवश्यक असते. 

सर्वप्रथम शाळा नोंदणी करा- माहितीसाठी येथे क्लिक करा.

NMMS-Scholarship-Exam-2022-23-online-form-min
NMMS

C. विद्याथ्र्यांची नोंदणी करणे व ऑनलाईन आवेदनपत्र भरणे,

१. School Profile ची माहिती भरून Save या बटनावर क्लिक केल्यानंतर, School Dashboard वरील बाजूस असलेल्या Student Registration Form या बटनावर विद्यार्थ्यांचा फॉर्म भरण्यासाठी क्लिक करा.

Student Registration Form या बटनावर क्लिक केल्यानंतर Student Registration हे पेज उघडेल. Student Details (प्रथम विद्याथ्र्यांची माहिती भरावयाची आहे.) UDISE Code Automatically येईल. Standard Automatically येईल (8th).

३ विद्यार्थी विनाअनुदानित शाळेत शिकत आहे का? शिकत असेल तर Yes व शिकत नसेल तर No हा पर्याय Dropdown लिस्ट मधून अचूकपणे निवडा

४ विद्यार्थी केंद्रीय विद्यालयात शाळेत शिकत आहे का? शिकत असेल तर Yes व शिकत नसेल तर No हा पर्याय Dropdown लिस्ट मधून अचूकपणे निवडा

५ विद्यार्थी जवाहर नवोदय विद्यालयात शाळेत शिकत आहे का? शिकत असेल तर Yes व शिकत नसेल तर No हा पर्याय Dropdown लिस्ट मधून अचूकपणे निवडा.

६. विद्यार्थी शासकीय वसतिगृह सवलतीचा, भोजन व्यवस्थेचा व शेक्षणिक सुविधांचा लाभ घेत आहेय का? लाभ घेत असेल तर yes व शिकत नसेल तर No हा पर्याय Dropdown लिस्ट मधून अचूक पाने निवडा.

७.  विद्यार्थी सैनिक शाळेत शिकत आहेय का? शिकत असेल तर Yes व शिकत नसेल तर No हा पर्याय Dropdown लिस्ट मधून अचूकपणे निवडा.

Upload Student Photo with Signature विद्यार्थ्याचा फोटो व स्वाक्षरी अपलोड करण्याची कार्यपद्धती - ८.५ सें.मी. x ४.५ से.मी. था चौकोन पांढऱ्या कागदावर काळ्या शाईच्या पेनाने स्पष्ट स्वाक्षरी इमेज २ kb १०० केबी या आकारामध्ये बसेल याची खात्री करून घ्यावी.

९ विद्यार्थ्याचे आडनाव, नाव, वडीलांचे, आईचे अचूक नमूद करावे, १० विद्यार्थ्याचे Gender Dropdown लिस्ट मधून अचूकपणे निवडा,

विद्यार्थ्याची जन्मतारीख DD, MM, YYYY या प्रमाणे अचूकपणे नमूद करावे,

११ Online जन्मतारीख निवडताना सर्वप्रथम वर्ष, महिना आणि जन्मतारीख याप्रमाणे निवडावे.

१२ आधार कार्ड असल्यास आधार क्रमांक अचूकपणे नमूद करा. आधार कार्ड नसल्यास सदरचा रकाना रिकामा सोडावा.

१३ विद्यार्थीच्या इ. ७ वी ची श्रेणी / Grade dropdown list मधून निवड करावी. आणि इ. ७ वी मिळालेले टक्के नमूद करावे.

१४ विद्यार्थी राहत असलेला विभाग (Area) शहरी/ ग्रामीण (RuralUrban) Dropdown लिस्ट मधून अचूकपणे निवडा.

१५ Differently Abled / Disabled मध्ये दिव्यांगत्व Dropdown लिस्ट मधून दिव्यांग असेल तर Yes निवडा. व विद्यार्थी दिव्यांग नसेल तर No हा पर्याय Dropdown लिस्ट मधून अचूकपणे निवडा,

१६. Yes, पर्याय निवडला असेल तर Type of Disability मध्ये दिव्यंगत्व ड्रॉपडाउन लिस्ट मधून अचूकपणे निवडा विद्यार्थी दिव्यांग असेल तर दिव्यांग प्रमाणपत्रावर नमूद असलेली दिव्यांगत्वाची टक्केवारी नमूद करावी. ts Need a Writer for Exam या रकान्यात विद्यार्थ्यास Writer पाहिजे असेल तर Yes writer पाहिजे नसेल तर No हा पर्याय Dropdown लिस्ट मधून अचूक पाने निवडा. १८ विद्यार्थ्याची जात संवर्ग Dropdown लिस्ट मधून अचूकपणे निवडा.

१९] Caste Name पुढील रकान्यात आपली जात नमूद करा. (उदा. माळी, सोनार, शिंपी....)...

२० भारत सरकार यांचे No. ३६०३९/१/२०१९ - Estt (Res) दि. ३१ जानेवारी २०१९ च्या अधिसूचनेनुसार Economically Weaker Section (EWS) च्या आरक्षणाचा लाभ घ्यावयाचा असेल तर Yes हा पर्याय आणि घायवयाचा नसेल तर No हा पर्याय Dropdown लिस्ट मधून अचूकपणे निवडा आरक्षणाचा लाभ सक्षम अधिकारयाचा EWS प्रमाणपत्र मुख्याध्यापकांकडे जमा करणे आवश्यक आहे २१ विद्यार्थाचा राहत असलेल्या ठिकाणाचा पूर्ण पत्ता:- ठिकाण / लैंडमार्क, गाव, तालुका व जिल्हा या क्रमाने अचूकपणे नमूद करावा. 

२२ राहत असलेल्या ठिकाणाचा ६ अंकी पिनकोड अचूकपणे नमूद करावा.

२३ राज्यस्तर परीक्षेसाठी MAT आणि SAT या विषयासाठी माध्यम Dropdown लिस्ट मधून अचूकपणे निवडा. २४ Bank Account Information या रकान्यात विद्यार्थाचे बँकेचे खाते असेल तर Yes व बँकेचे खाते नसेल तर No हा पर्याय Dropdown लिस्ट मधून अचूकपणे निवडा. २५ Bank Account Information Yes पर्याय निवडला असेल तर Bank Account Number, IFSC code, Name of Bank, Branch and Full Address of Branch अचूकपणे नमूद करा.

Family Details:

२६ Father's Education वडिलांचे शिक्षण Dropdown लिस्ट मधून अचूकपणे निवडा. 

२७ Father's Occupation वडिलांचा व्यवसाय Dropdown लिस्ट मधून अचूकपणे निवडा,

२८ Mother's Education: आईचे शिक्षण Dropdown लिस्ट मधून अचूकपणे निवडा.

२९ Mother's Occupation आईचा व्यवसाय Dropdown लिस्ट मधून अचूकपणे निवडा.

३० कुटुंबात किती व्यक्ती आहेत Dropdown लिस्ट मधून अचूकपणे निवडा,

३१ विद्यार्थ्यास किती भाऊ आहेत Dropdown लिस्ट मधून अचूकपणे निवडा. ३२ विद्यार्थ्यास किती बहिणी आहेत Dropdown लिस्ट मधून अचूकपणे निवडा. 

३३ कुटूंबातील एकूण बहिण भाऊ यामध्ये विद्यार्थ्याचा कितवा क्रमांक आहे Dropdown लिस्ट मधून अचूकपणे निवडा.

३४ संपर्क माहितीमध्ये पालकांचा दहा अंकी मोबाईल क्रमांक अचूकपणे नमूद करा.

३५ पालकाचा Email ID अचूकपणे नमूद करा. ३६ परिवाराचे उत्पन्न Dropdown लिस्ट मधून अचूकपणे निवडा.

Declaration:

३७ सदरच्या Declaration फॉर्ममध्ये मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्याची इ. ७ वी च्या गुणांची टक्केवारी एकूण मिळालेले गुण व एकूण गुण ही माहिती अचूकपणे नमूद करावी.

३८ वरील सर्व माहिती योग्यरित्या भरल्यानंतर Preview या बटनावर क्लिक करा. 

३९ Preview या बटनावर क्लिक केल्यानंतर विद्यार्थ्याचे भरलेले आवेदनपत्र दिसेल.

४० सदर आवेदनपत्रात विद्यार्थ्याची भरलेली सर्व माहिती बरोबर आहे याची खात्री करणेकरीता Save Preview बटनावर क्लिक करावी.

४१ जर विद्यार्थ्याची कोणती माहिती चुकीची भरलेली असेल व ती दुरुस्त करावयाची असेल तर Edit बटनावर क्लिक करावे व सदर दुरुस्ती करून Save / Preview या बटनावर क्लिक करावे. 

४२] Save / Preview या बटनावर क्लिक केल्यानंतर विद्यार्थ्याचे भरलेले आवेदनपत्र दिसेल.

४३ विद्यार्थ्यांची सर्व माहिती भरलेले बरोबर असल्यास Submit या बटनावर क्लिक करा..

४४ डाव्या बाजूस Dash Board या बटनावर क्लिक केल्यानंतर वर नमूद केलेल्या विद्यार्थ्यांची माहिती Dash Board वर Pending Payment Student list या मध्ये दिसेल. 

४५. ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी शेवटच्या तारखेपर्यंत विद्यार्थ्याची कोणतीही माहिती Edit करता येईल, याची नोंद घ्यावी. उपरोक्त प्रमाणे या परीक्षेस प्रविष्ठ होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे फॉर्म भरावे.

D. विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क ऑनलाईन भरणे.-  

डाव्या बाजूस Dash Board या बटनावर क्लिक केल्यानंतर वर नमूद केलेल्या विद्यार्थ्याची माहिती Dash Board वर Pending Payment Student list यामध्ये दिसेल. Dash Board वर उजव्या बाजूस असलेल्या Make Payment या बटनावर क्लिक करावे. 3 प्रत्येक विद्यार्थ्याच्या माहिती समोर Check Box आहे. Check Box मध्ये / टिक करून विद्यार्थ्याचे वैयक्तिक / सामूहिक शुल्क भरण्यासाठी Proceed to payment या बटनावर क्लिक करावे.

 Proceed to payment या बटनावर क्लिक केल्यास ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्याचे शुल्क भरण्यासाठी क्रेडीट कार्ड, डेबिट कार्ड, एटीएम पिन व इंटरनेट बैंकिंग, असे पर्याय उपलब्ध होतील.  आपणास सोयीस्कर असलेल्या पर्यायाद्वारे ऑनलाईन शुल्क भरावे. चलनाद्वारे ऑफलाईन शुल्क भरण्याचा पर्याय उपलब्ध नाही. 

ऑनलाईन शुल्क भरतेवेळी इंटरनेट, बीज जाणे यामुळे शुल्क जमा न झाल्यास पुन्हा लॉगीन करून शुल्कऑनलाईन भरावे.

 शुल्क जमा झाल्यास स्क्रीनवर ईमेलवर व मोबाईलवर Payment Successful असा मेसेज येईल. आणि Transaction Details स्क्रीनवर दिसतील. ९ Transaction Details Download करा व Print काढा.

 Payment details जर पुन्हा पहावयाचे असतील तर Dash Board वर डाव्या बाजूस असलेल्या Transaction History या बटनावर क्लिक करावे.

अशाप्रकारे आपण आपल्या मुलांचे NMMS Scholarship Exam 2022-23  online form राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा  (NMMS) २०२२-२३ भरू शकता. आशा करतो आपणास सर्व माहिती समजली असले. 

आपणास हे ही आडेल.

१) NMMS Scholarship Exam पात्रता नियम माहिती 

२) NMMS Scholarship Exam  शाळा नोंदणी 

३) शिष्यवृत्ती परीक्षा सराव परीक्षा 

४) नवोदय परीक्षा सराव प्रश्न परीक्षा