राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे शिकू  आनंदे Learn with Fun

कोविड 19 मुळे राज्यातील सर्व शाळा सुरवातीला कांही कालावधीसाठी बंद करण्यात आल्या त्यानंतर कोरोना प्रदूर्भाव कमी झाली परीस्थितीमध्ये सुधारणा झाली आणि कांही कालावधीसाठी शाळा सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र परत परिस्थिती बदलली आणि शाळा पून्हा बंद करण्यात आल्या. शाळेत शिक्षण घेणे व शिकणे बंद झाले. शाळा बंद असताना देखील शिक्षण सुरू रहावे या उद्देशाने शासनामार्फत विविध उपक्रम राबवण्यात आले. ज्यामध्ये सेतू उपक्रमस्वाध्यायअभ्यासमाला दूरदर्शन वरील विविध कार्यक्रम अशा एक ना अनेक उपक्रमातून मुलांचे शिक्षण सुरू रहावे यासाठी प्रयत्न करण्यात आले. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून शिकू  आनंदे Learn with Fun  हा उपक्रम राबवला जात आहे. या उपक्रमाविषयी थोडक्यात माहिती पाहू.
Learn-with-Fun

विषय: शिकू  आनंदे Learn with Fun  या उपक्रमाबाबत

 उपरोक्त विषयानुसार मार्च २०२० पासून कोविडच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील सर्व  शाळा बंद होत्या.टप्याटप्याने सर्व शाळा सुरू झाल्या आहेत. शाळेतील सर्व  मुलांचे शिकणे आनंददायी पद्धतीने सुरु रहावे या हेतूने  राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषेदे मार्फत online पद्धतीने विविध शैक्षणिक कार्यक्रम घेण्यात येत आहेत. परिषेदेच्या सामाजिक शास्र व कला क्रीडा विभागामार्फत  इ.१ ली ते ८ वीच्या वर्गात अध्ययन करणाऱ्या राज्यातील सर्व मुलांसाठी कलाशारीरिक शिक्षण व कार्यानुभव या विषयाबाबत दर शनिवारी दि.३ जुलै २०२१ पासून  online पद्धतीने 'शिकू आनंदे' (Learn with Fun) हा उपक्रम  सुरू करण्यात आला आहे.  दि.१६ एप्रिल २०२२ रोजीच्या भागाच्या सत्रात मल्लखांब, नृत्य, गीतगायन, फोटोफ्रेम बनवणे या विषयांबाबत तज्ञ शिक्षकाकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. स.१० ते ११ या वेळेत इ६ वी ते ८ वी साठी हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. पुढील यु ट्यूब लिंकद्वारे आपणाला या कार्यक्रमात सहभागी होता येईल. 


Learn with Fun शिकू आनंदे Learn with Fun दि. 16 April २०२२ इयत्ता १ ली ते ५ वी

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,महाराष्ट्र पुणे
इ.६ वी ते ८ वी साठी
दिनांक-  16 April 2022 वार-  शनिवार
वेळ – सकाळी स.१० ते ११
विषय-  मल्लखांब, नृत्य, गीतगायन, फोटोफ्रेम बनवणे


Live पहा ---