राष्ट्रीय विज्ञान दिन २०२२ (National Science Day 2022) #scienceday2022,#nationalscienceday2022 शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन

दरवर्षी 28 फेब्रुवारी रोजी सर सी. व्ही. रामन यांच्या रामन परिणाम या संशोधन कार्याबद्दल त्यांना मिळालेल्या नोबेल पुरस्काराच्या अनुषंगाने देशभरात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात येतो. विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय,भारत सरकार यांचेमार्फत राष्ट्रीय विज्ञान दिन २०२2 साजरा करण्यासाठी यावर्षी शाश्वत विकासासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा एकात्मिक दृष्टीकोन हा विषय निश्चित केला असून त्या अनुषंगाने विविध शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. त्याच धर्तीवर विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयासंबंधित माहिती व समस्या याबाबत शास्त्रीय माहितीचा प्रसार करणे, वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे, विज्ञान विषयाबाबत अभिरुची विकसित करणे या विविध हेतूने राज्यातील सर्व शाळांमधील इयत्ता पहिली ते बारावीच्या सर्व विद्यार्थी आणि शिक्षक यांचेसाठी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त स्तरनिहाय खालील शैक्षणिक कार्यक्रम ऑनलाईन/ऑफलाईन पध्दतीने दि.२१ ते २८ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत घेण्यात यावेत.

National-Science-Day-2022

खालील तक्त्याप्रमाणे शाळांमध्ये विद्यार्थी आणि शिक्षक यांचेसाठी शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन करून आपल्या उपक्रमाचा/कार्यक्रमाचा २ ते ३ मिनिटापर्यंतचा सुस्पष्ट व्हिडिओ ,फोटो व इतर साहित्य फेसबुक ,इंस्टग्राम,ट्वीटर इ.समाज संपर्क माध्यमांवर #scienceday2022,#nationalscienceday2022 या हँशटँगचा वापर करून पोस्ट अपलोड करावी. आपण समाज संपर्क माध्यमांवर अपलोड केलेल्या पोस्ट https://scertmaha.ac.in/competitions/ या लिंकवर नोंदविण्यात यावी. उत्कृष्ट उपक्रमास राज्यस्तरावरून प्रसिद्धी देण्यात येईल.

सदर उपक्रमांचे आयोजन करताना कोविड-१९ च्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य शासनाने वेळोवेळी दिलेल्या सामाजिक अंतर राखणे आणि स्वच्छतेच्या आवश्यक त्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याची दक्षता घेण्यात यावी.

राज्यातील सर्व माध्यमांच्या आणि व्यवस्थापनांच्या शाळांमधील जास्तीत जास्त विद्यार्थी आणि शिक्षक यांनी वरील नमूद करण्यात आलेल्या ऑनलाईन/ ऑफलाईन पध्दतीने कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावे यासाठी आपल्या कार्यक्षेत्रातील क्षेत्रीय अधिकारी, शाळा, शिक्षक, पालक यांना अवगत करण्यात यावे. अधिकाधिक विद्यार्थी आणि शिक्षक यामध्ये सहभागी होतील यासाठी आवश्यक ती कार्यवाही आपल्या स्तरावरून करण्यात यावी.

परिपत्रक - 

महाराष्ट्र शासन

जा.क्र. जिशिवप्रसना/राष्ट्रीय विज्ञान दिन / २०२१-२२/104 दि. २२/०२/२०२२

विषय: 28 फेब्रुवारी 2022 हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा करणे बाबत.

संदर्भ मा. सहसंचालक, SCERT पुणे यांचे पत्र ८७३. दि. १७.०२.२०२२ 

दरवर्षी 28 फेब्रुवारी रोजी सर सी. व्ही. रामन यांच्या रामन परिणाम या संशोधन कार्याबद्दल त्यांना मिळालेल्या नोबेल पुरस्काराच्या अनुषंगाने देशभरात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात येतो. विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार यांचेमार्फत राष्ट्रीय विज्ञान दिन २०२२ साजरा करण्यासाठी यावर्षी शाश्वत विकासासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा एकात्मिक दृष्टीकोन हा विषय निश्चित केला असून त्या अनुषंगाने विविध शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. त्याच धर्तीवर विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयासंबंधित माहिती व समस्या याबाबत शास्त्रीय माहितीचा प्रसार करणे, वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे, विज्ञान विषयाबाबत अभिरुची विकसित करणे या विविध हेतूने राज्यातील सर्व शाळांमधील इयत्ता १ ली ते १२ वीच्या सर्व विद्यार्थी आणि शिक्षक यांचेसाठी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त स्तरनिहाय खालील शैक्षणिक कार्यक्रम ऑनलाईन/ऑफलाईन पध्दतीने दि. २१ ते २८ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत घेण्यात यावेत. पत्रात दिलेल्या तक्त्याप्रमाणे शाळांमध्ये विद्यार्थी आणि शिक्षक यांचेसाठी शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन करून आपल्या उपक्रमाचा/कार्यक्रमाचा २ ते ३ मिनिटापर्यंतचा सुस्पष्ट व्हिडिओ फोटो व इतर साहित्य फेसबुक, इंस्टाग्राम, ट्वीटर इ.समाज संपर्क माध्यमांवर #scienceday2022, #nationalscienceday2022 या हॅशटॅगचा वापर करून पोस्ट अपलोड करावी. आपण समाज संपर्क माध्यमांवर अपलोड केलेल्या पोस्ट https://scertmaha.ac.in/competitions/ या लिंकवर नोंदविण्यात यावी. उत्कृष्ट उपक्रमास राज्यस्तरावरून प्रसिद्धी देण्यात येईल.

स्पर्धेत/ उपक्रमात कसे सहभागी व्हावे- 

खालील तक्त्याप्रमाणे शाळांमध्ये विद्यार्थी आणि शिक्षक यांचेसाठी शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन करून आपल्या उपक्रमाचा/कार्यक्रमाचा २ ते ३ मिनिटापर्यंतचा सुस्पष्ट व्हिडिओ ,फोटो व इतर साहित्य फेसबुक ,इंस्टग्राम,ट्वीटर इ.समाज संपर्क माध्यमांवर #scienceday2022,#nationalscienceday2022 या हँशटँगचा वापर करून पोस्ट अपलोड करावी. आपण समाज संपर्क माध्यमांवर अपलोड केलेल्या पोस्ट https://scertmaha.ac.in/competitions/ या लिंकवर नोंदविण्यात यावी. उत्कृष्ट उपक्रमास राज्यस्तरावरून प्रसिद्धी देण्यात येईल.

स्पर्धेत सहभागी झाल्यानंतर काय करावे- 

    आपला व्हिडिओ आपल्या उपक्रमाचा/कार्यक्रमाचा २ ते ३ मिनिटापर्यंतचा सुस्पष्ट व्हिडिओ ,फोटो व इतर साहित्य फेसबुक ,इंस्टग्राम,ट्वीटर इ.समाज संपर्क माध्यमांवर #scienceday2022,#nationalscienceday2022 या हँशटँगचा वापर करून पोस्ट अपलोड केल्यानंतर https://scertmaha.ac.in/competitions वेबसाईटवर आपल्या पोस्टची लिंक टाकून खालीलप्रमाणे येणारा फॉर्म भरावा. 

विद्यार्थी सहभाग नोंदणी 


उपक्रम व विषय - 

nationalscienceday2022


पत्रक लिंक - येथे क्लिक करा




आपणास हे ही आवडेल
 शिष्यावर्ती परीक्षा अभ्यासक्रम 

 इयत्ता 8 वी

कोणत्याही स्पर्धा परीक्षासाठी त्या परीक्षेचे स्वरूप कसे आहेकोणकोणत्या स्वरूपाचे प्रश्न विचारले जातातअभ्यासक्रम कसा आहेप्रश्नपत्रिका स्वरूप कसे असते ? घटक उपघटक व त्यांना असलेला भारांश याविषयी माहिती असणे आवश्यक असते. आपणास जर यश संपादन करावयाचे असेल तर योग्य नियोजन व आभ्यासक्रम या दोन गोष्टी महत्वाच्या असतात.

1) शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ८ वीअभ्यासक्रम विषय बुद्धिमत्ता  

2) शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8 वी अभ्यासक्रम विषय इंग्रजी  

3) शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ८ वी अभ्यासक्रम विषय मराठी  

4) शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8 वी अभ्यासक्रम विषय गणित 

 इयत्ता 5 वी

1) शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ५ वी अभ्यासक्रम विषय बुद्धिमत्ता 

2) शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ५ वी  अभ्यासक्रम विषय मराठी 

3) शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ५ वी अभ्यासक्रम विषय इंग्रजी 

4) शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ५ वी अभ्यासक्रम विषय गणित 

शिष्यवृत्ती परीक्षा माहिती  

Scholarship चाचणी सोडावा  

 जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 

Download link