मराठी भाषा गौरव दिन

मराठी भाषा गौरव दिन हा दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी साजरा करण्यात येतो. कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्रच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले असून मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी अथक परिश्रम घेतले गेले आहेत. आपल्या मातृभाषेला गौरव म्हणून व कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून त्यांचा जन्मदिवस 'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून साजरा करण्याचा शासन निर्णय दिनांक २१ जानेवारी इ.स. २०१३ रोजी घेण्यात आला.

मराठी-भाषागौरव-दिन

भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद 347 नुसार लक्षणीय प्रमाणात लोकांकडून बोलल्या जाणाऱ्या कोणत्याही भाषेला राष्ट्रपतींना राजभाषा म्हणून मान्यता देण्याची तरतूद व अधिकार आहे. ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त मराठी कवी कुसुमाग्रज यांचे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रातील योगदान महत्त्वपूर्ण असल्याने त्यांना अभिवादन म्हणून २१ जानेवारी २०१३ रोजी महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार कुसुमाग्रजांचा जन्मदिवस २७ फेब्रुवारी हा "मराठी भाषा गौरव दिन" म्हणून घोषित करण्यात आले. महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण २०१० मध्ये कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस २७ फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून नमूद केलेले आहे. १ मे १९६० ला महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली, तेव्हापासून "१ मे" दिवस हा मराठी राजभाषा दिन किंवा मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. 

महाराष्ट्राची अधिकृत राजभाषा ही मराठी असेल असे जाहीर करणारे वसंतराव नाईक सरकार यांनी 'मराठी राजभाषा अधिनियम १९६४' सर्वप्रथम ११ जानेवारी १९६५ रोजी प्रसिद्ध केला. सन १९६६ पासून तो अंमलात आला.  १ में रोजी मराठी राजभाषा दिनाच्या निमित्ताने घोषणा करीत असतांना वसंतराव नाईक यांनी मांडलेले मराठी भाषा दिनाचे मांडलेले विचार प्रेरक होते. वसंतराव नाईक सरकारने पुढे मराठी भाषा संवर्धनासाठी राज्यात पहिल्यांदाच भाषा संचालनालयाची निर्मिती करीत प्रादेशिक स्तरावर चार केंद्राची स्थापना केली. राज्यकारभार मराठीतून चालणार असे अधिकृत जाहीर केले. अनेक मराठी लोकांसाठी व आधिकाऱ्यांसाठी 'राजभाषा परिचय' पुस्तकही प्रकाशित करण्यात आले. 'मराठी भाषा गौरव दिवस' (२७ फेब्रुवारी) आणि 'मराठी भाषा दिवस' (१ मे) हे स्वतंत्र दिवस असून या दिवसाचे स्वतंत्र असे महत्त्व आहे.

मराठी राजभाषा दिन- 

मराठी राजभाषा दिन हा दर वर्षी २७ फेब्रुवारी या दिवशी साजरा केला जातो. या दिवसाला मराठी भाषा दिवस, मराठी भाषा गौरव दिन, मराठी राजभाषा दिन, मराठी भाषा दिन अशा विविध नावाने संबोधले जाते. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते मराठी साहित्यिक वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने हा दिवस साजरा करण्याची प्रथा सुरु झाली.

माझ्या मराठी मातीचा, लावा ललाटास टिळा,

हिच्या संगाने जागल्या, दऱ्याखोऱ्यांतील शिळा.

हिच्या कुशीत जन्मले, काळे कणखर हात,

ज्यांच्या दुर्दम धीराने, केली मृत्यूवरी मात."

कुसुमाग्रज यांच्या या ओळींनी अवघ्या मराठी जनाना अभिमान दिले आहे. मराठी भाषेला सन्मान मिळवून देण्यासाठी कुसुमाग्रजांनी आयुष्यभर प्रयत्न केले म्हणूनच त्याच्या जन्मदिवसाला हा दिन साजरा करण्यात येतो. क्रांतीचा जयजयकार, वेडात मराठे वीर दौडले सात, आगगाडी आणि जमीन, पृथ्वीचे प्रेमगीत या कुसुमाग्रजांच्या कविता आजही लोकप्रिय आहेत. मराठी भाषा ही ९व्या शतकापासून प्रचलित आहे व तिची निर्मिती संस्कृतपासून झाली आहे. महाराष्ट्र

आणि गोवा ह्या दोन राज्यांची मराठी ही अधिकृत राजभाषा आहे. मराठी बोलणाऱ्या लोकसंख्येनुसार मराठी ही भारतातील तिसरी व जगातील पंधरावी भाषा आहे.

"माझा मराठीची बोलू कौतुके ।

परि अमृतातेही पैजासी जिंके।

ऐसी अक्षरे रसिके। मेळविन। 

असे लिहून संत ज्ञानेश्वर म्हणतात की मराठी भाषेचा गोडवा अमृतापेक्षाही जास्त आहे. मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने शाळा वा कॉलेज मध्ये निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा आयोजित केल्या जातात, तसेच ठिकठिकाणी मराठी नाटके, काव्य संमेलन व मराठी संगीताचे कार्यक्रम आयोजित केले जातात. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आपण सर्वांनी मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे, तरच मराठी राजभाषा दिन साजरा करण्याला खरा अर्थ प्राप्त होईल.



मराठी राजभाषा दिन प्रश्नमंजुषा -