राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे
शिकू आनंदे Learn with Fun
कोविड 19 मुळे राज्यातील सर्व शाळा सुरवातीला कांही कालावधीसाठी बंद करण्यात आल्या त्यानंतर कोरोना प्रदूर्भाव कमी झाली परीस्थितीमध्ये सुधारणा झाली आणि कांही कालावधीसाठी शाळा सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र परत परिस्थिती बदलली आणि शाळा पून्हा बंद करण्यात आल्या. शाळेत शिक्षण घेणे व शिकणे बंद झाले. शाळा बंद असताना देखील शिक्षण सुरू रहावे या उद्देशाने शासनामार्फत विविध उपक्रम राबवण्यात आले. ज्यामध्ये सेतू उपक्रम, स्वाध्याय, अभ्यासमाला दूरदर्शन वरील विविध कार्यक्रम अशा एक ना अनेक उपक्रमातून मुलांचे शिक्षण सुरू रहावे यासाठी प्रयत्न करण्यात आले. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून शिकू आनंदे Learn with Fun हा उपक्रम राबवला जात आहे. या उपक्रमाविषयी थोडक्यात माहिती पाहू.
प्रति,
उपसंचालकप्रादेशिक विद्या प्राधिकरण,मुंबई
प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था
शिक्षणाधिकारी प्राथ.माध्य.
प्रशासन अधिकारी मनपा
विषय: शिकू आनंदे Learn with Fun या उपक्रमाबाबत
उपरोक्त विषयानुसार मार्च २०२० पासून कोविडच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील सर्व शाळा बंद होत्या.टप्याटप्याने सर्व शाळा सुरू झाल्या आहेत. शाळेतील सर्व मुलांचे शिकणे आनंददायी पद्धतीने सुरु रहावे या हेतूने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषेदे मार्फत online पद्धतीने विविध शैक्षणिक कार्यक्रम घेण्यात येत आहेत. परिषेदेच्या सामाजिक शास्र व कला क्रीडा विभागामार्फत इ.१ ली ते ८ वीच्या वर्गात अध्ययन करणाऱ्या राज्यातील सर्व मुलांसाठी कला, शारीरिक शिक्षण व कार्यानुभव या विषयाबाबत दर शनिवारी दि.३ जुलै २०२१ पासून online पद्धतीने 'शिकू आनंदे' (Learn with Fun) हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. दि. 5 फेब्रुवारी रोजीच्या भागाच्या सत्रात योगासने नृत्य गीतगायन काथ्या
स.१० ते ११ या वेळेत इ. ६ वी ते ८ वी च्या मुलांसाठी कार्यक्रम संपन्न होणार असून पुढील यु-ट्यूब लिंकद्वारे सहभागी होता येईल.
याबाबत वरिष्ठ अधिकारी केंद्र प्रमुख विषय सहायक यांनी कार्यक्रमास उपस्थित रहावे. तसेच whats app समूहाद्वारे आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व शाळा व विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहचवावी. जास्तीत जास्त विद्यार्थी या उपक्रमात सहभागी होतील याबाबत योग्य कार्यवाही करावी.
एम देवेंदर सिंह भा.प्र.से
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे
0 Comments